विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केलेल्या १६ जणांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून काव प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी ही माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटकपक्षांकडून उमेदवारी यादी जाहिर करताना काही जागांवर एका पक्षाने उमेदवार दिलेला असतानाही दुसऱ्या पक्षाने उमेदवार जाहिर केला. त्यानंतर महाविकास आघाडीने मैत्रीपूर्ण लढत लढणार नसल्याचे सांगत आणि मतांचे विभाजन नको म्हणून आपापल्या पक्षातील इच्छुक इच्छुक उमेदवारांना ज्या ठिकाणी जागा वाटपाच्या चर्चेत एका मतदारसंघात दोन पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले अशांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश दिले. तरीही काही जागांवर पक्षाचा आदेश न जुमानता आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे काँग्रेसने अशा बंडखोर उमेदवारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
निवडणूकीच्या जागा वाटपाच्या चर्चे दरम्यान महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत काही मतदारसंघात महाविकास आघाडीतील दोन दोन पक्षांनी उमेदवार उभे केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी मैत्रीपूर्ण लढत लढणार का असा सवाल केला. त्यावर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढणार नाही असे सांगत मतांचे विभाजन आम्हाला करायचे नाही असेही उत्तर दिले.
तर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारांना ज्या ठिकाणी असे दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. अशांना जागा वाटपातील चर्चेनुसार ती जागा संबधित पक्षाला सोडण्यात येईल, तसेच ज्यांना चूकीमुळे अर्ज दाखल केला असेल त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे सांगितले आहे. तसेच पक्षाने सांगूनही जर संबधित उमेदवारांने अर्ज मागे घेतला नसेल तर त्यावर महाविकास आघाडीतील त्या त्या पक्षाकडून बंडखोरांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे जाहिर केले.
त्या अनुषंगाने मध्यंतरीच्या काळात शिवसेना उबाठा पक्षाकडून काही बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली. तर काँग्रेसने आज एकदम १६ उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केली.
काँग्रेसने निलंबित केलेल्या बंडखोर उमेदवारांची यादी खालीलप्रमाणेः-

Marathi e-Batmya