मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील आशा स्वयंसेविकांना आतापर्यत फक्त दोन हजारारूपयांपर्यतचे मानधन मिळत होते. आता त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून राज्य सरकारचे दोन हजार आणि केंद्राचे दोन हजार रूपये असे मिळून त्यांना चार हजार रूपये आणि कामाच्या स्वरूपानुसार त्यांच्या मानधनात वाढ करत प्रती महिना १५ हजार रूपयांचे मानधन त्यांना मिळू शकते अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गटप्रवर्तकाच्या मानधनातही वाढ करण्यात आली असून त्यांना आता प्रतिमाह ३ हजार रूपये मिळणार असल्याची माहिती त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
आशा स्वयंसेविकांना दरमहा कमाल रुपये २ हजार पर्यंत तर गट प्रवर्तकांना ३ हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येतील. यासाठी १७० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. जुलै पासून ही वाढ लागू होईल. सध्या राज्यात ग्रामीण आणि नागरी भागात ६५ हजार ७४० आशा स्वयंसेविकांची पदे भरलेली आहेत.
Marathi e-Batmya