मुंबई-पुण्यात यायचंय-जायचंय? अजिबात विचार करायचा नाही बाकीच्या रेड झोनमधील प्रवेशाचा निर्णय पोलिस आयुक्तांकडे

मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटक यांना त्यांच्या मूळ गावी परतण्यासाठी प्रवासाची मूभा देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आंतरजिल्हा प्रवासासही मूभा दिली. मात्र मुंबई महानगरातून बाहेर जायचंय किंवा यायचंय तर अजिबात विचार करायचा नाही. या महानगरातून बाहेर जाण्यासाठी किंवा येण्यासाठी कोणतीही परवानगी न देण्याचा निर्णय राज्य सरकारने कालच जाहीर केला असून तसे आदेशही आज पारित करण्यात आले.
याशिवाय औरंगाबाद, नागपूर, सोलापूर , नाशिक, अमरावती आदी ठिकाणी आयुक्तालय असलेल्या जिल्ह्यात जायचे असेल तर त्या भागातील पोलिस आयुक्तालयास परवानगीचे अधिकार देण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिकची नियमावली खालील प्रमाणे
मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा अशा शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
१. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.
२. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
३. मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे.
४. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
५. कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये.
६. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.
७. असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
८. कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *