‘बायजुस – द लर्निंग अॅप’ ची महाराष्ट्र पोलिसांना अशीही मदत शालेय विद्यार्थ्यांना मोफत अॅप उपलब्ध करून देणार

मुंबई: प्रतिनिधी
कोविड विरोधी लढ्यात सर्वात पुढे असलेल्या राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी बायजुस अॅपने पुढाकार घेतला आहे. पोलिसांच्या पाल्यांना अर्थात शालेय मुलांना विनाशुल्क बायजुस-द लर्निग अॅप कंपनीने ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचे अॅप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत पोलिसांना एक आगळी वेगळी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली असली तरी शाळा, महाविद्यालयांना प्रत्यक्ष सुरु करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन अथवा डिजीटल पध्दतीने शिक्षण देण्यास परवानगी दिली. तसेच अशा पध्दतीच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा आजच शुमारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यामुळे कोरोनाग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन, डिजीटल पध्दतीचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांची मुलंही शाळेत जात असणार आहेत. त्यामुळे या मुलांना चांगल्या पध्दतीने ऑनलाईन शिक्षण मिळावे याकरिता हे अॅपच राज्यातील पोलिसांच्या मुलांना विनाशुल्क देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र पोलिस महासंचालक कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसेच हे विनामूल्य अॅप दिल्याबद्दल पोलिस महासंचालकांनी बायजुस- द लर्मिग अॅप कंपनीचे आभार मानले आहे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अशोक खरात प्रकरणाने महायुती सरकार पोखरले… इंधन टंचाईचे खापर राहुल गांधींवर फोडून भाजपाचा जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांचे विधान दिशाभूल करणारे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची निवड करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *