पगार कापून बिले आलीत, पण मुख्यमंत्रीसाहेब पोलिसांना पुर्ण पगार द्या भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांचे पगार कपात केली जाणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने जाहीरपणे दिली. तरी अद्याप पोलीसांचे पगार झालेले नाहीत. मात्र ट्रेजरीकडे आलेली पे बिल २५% कपात करुन आल्याने पगार कपात करून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे पोलिसांना पुर्ण पगार द्या, अशी मागणी भाजप नेते अँड. आशिष शेलार यांनी केली.

पोलिस खात्याकडून ट्रेझरी पाठवण्यात आलेली पे बिले ही २५% कपात करुन पाठविण्यात आली आहेत. याची माहिती मिळताच अँड. शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, एकतर अद्याप पोलिसांना पगार मिळालेले नाहीत, आणि जे मिळतील ते २५% कपात करुन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे मुख्यमंत्र्यांनी स्वतः तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे

कोरोना आणि त्यामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत पोलीस आपला जीव धोक्यात घालून दिवस-रात्र काम करीत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही, याकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे प्रशासकीय विलंब न करता व कपात न करता पोलीसांचे पुर्ण पगार तातडीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *