दाऊदची भीक मागणाऱ्यांनीच आलेली संधी गमावली प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबईः प्रतिनिधी
1993 च्या मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या अशी भीक मागणाऱ्यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता. मात्र त्यांच्यामुळे संधी हुकल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.
दाऊद अब्राहिम भारताकडे सरेंड करण्यास तयार होता. दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे. मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली. याबाबत शरद पवार यांनीच खुलासा करावा अशी मागणीदेखील त्यांनी केली.
आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये दाऊद अब्राहिम आणि राम जेठमलानी यांची भेट झाली होती. त्यावेळी त्याने आपण आत्मसमर्पण करत न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्याची तयारी दाखविली. तसेच मला जेलमध्ये ठेवलं तरी चालेल असं त्याचं म्हणणं होतं. त्याची एकच मागणी होती की थर्ड डिग्री वापरली जाऊ नये. राम जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांकडे दिली होती.
परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तसेच या निर्णयात युपीए सरकार सुद्धा सहभागी आहे असं सांगण्यात आलं होतं असंही ते म्हणाले.
जर दाऊद समर्पण करायला तयार होता तर शरद पवार यांनी त्याचे आत्मसमर्पण करवून न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी का करुन घेतले नाही याचा खुलासा होणे आवश्यक आहे. ज्यावेळी हे सर्व उघड झालं. त्यावेळी 2015 मध्ये नरेंद्र मोदींचे भाजपा सरकार होते. मग त्यांनी सुद्धा त्यावेळी दाऊदला भारतात आणण्याचा प्रयत्न का केला नाही?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार यांनी प्रस्ताव का फेटाळला ? कोणाच्या सांगण्यावरुन फेटाळला ? आणि हे उघड झाल्यानंतर सध्याच्या भाजपा सरकारने का प्रयत्न केले नाहीत याचा खुलासा कऱण्याची मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *