दिल्ली चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा आरोप, सरकारी आकडा खोटा.. दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून केला आरोप

काल रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. आणि दिल्ली रेल्वे स्थानकावर एकच धावपळ सुरु होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या घटनेवरून रेल्वे मंत्रालय आणि सरकारच्या बेजबादार वृत्तीमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही केला.

यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाकुंभच्या आयोजनाचा मुद्दा भाजपाने प्रचाराचा मुद्दा केला. तसेच दिल्लीच्या रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांचा आकडा काही सांगितला जात असला तरी हा आकडा १२० पर्यंत गेला असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीतील घटनेत किती लोक मृत्यूमुखी पडले याचा सरकारने दिलेला आकडा खोटा असून माझ्या माहितीप्रमाणे १२० ते १५० लोकांचा यात मृत्यू झाला आहे. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपाकडून निमंत्रण दिले जात आहे, जणू काही हा भाजपाचा सोहळा आहे. लोकांना भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी जेवण-राहण्याची सोय आहे. सर्व काही केले आहे. पण तशी काही व्यवस्था केली नसून इतकी व्यवस्था कोणत्याच महाकुंभ मेळ्यात झाली नव्हती असेही यावेळी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणत होते, ५० कोटी लोक कुंभमेळ्यात आले, पण मेले किती, याचा आकडा कधी सांगणार प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत किती लोक मरण पावले अशी प्रश्नांची सरबती करत कुंभमेळ्यात सात हजार बेपत्ता झाले आहेत. सता हजार लोक गेले कुठे असा सवाल करत एक तर त्यांचा मृत्यू झाला किंवा बेपत्ता झाले असे सांगत दिल्लीतील चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांचा आकडा दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

सरकारच्या व्यवस्थापनावरून संजय राऊत म्हणाले की, सरकारकडून महाकुंभचे मार्केटींग सुरु आहे. पण यात लोक मरण पावत आहेत, याची चिंता सरकारला नाही. दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेशमुधून लोंढेंच्या लोंढे प्रयागराजला निघाले आहेत, रेल्वे स्थानकावर प्रवाशी खिडकीच्या काचा फोडताना दिसत आहेत. दरवाजे तोडून गाडीत जात आहेत. एवढी गर्दी अनावर झाली आहे, राष्ट्रपतीपासून मोठ-मोठे उद्योगपती महाकुंभ मेळाव्याला जात आहेत. माध्यमेही प्रसिद्धी देत आहेत. पण चिरडून मेलेल्या गरीब लोकांचा आक्रोशही दाखविला पाहिजे अशी आशाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील एमटीडीसीची तीन एकर जमीन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *