अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्या

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेल प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेत मागणी केली आहे. या मागणीला राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेल च्या सर्व जिल्हाध्यक्षांनी होकार दर्शवला आहे.

सुनिल मगरे हे मागील तीस वर्षापासून शैक्षणिक व आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभेवर व सलग दोनदा प्रतिनिधीत्व केले आहे त्यांनी मागासवर्गीय शिष्यवृत्ती वाढ आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार लढा, ओबीसी OBC विद्यार्थी शिष्यवृत्ती आंदोलनाचे नेतृत्व केले आहे तसेच शैक्षणिक प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. अजितदादांनी राज्यातील राजकारणात धाडसी निर्णय घेऊन वेगळी राजकीय भूमिका घेतली तेव्हापासून सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनिल मगरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध भागात आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे व विचार रूजविण्याचा प्रयत्न करत आहे. लोकशाहीत बहुमत व विविध जात, धर्म, समूहांचा सहभाग पक्ष कार्यात असणे आवश्यक असतो. आंबेडकरी समाज हा महाराष्ट्रातील मोठी लोकसंख्या व राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असणारा समाज आहे या समाजाचा पाठिंबा हा हमखास सत्तेत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या समाजातील बहुसंख्याने सुशिक्षित असणारा वर्गाचा सकारात्मक दृष्टिकोन निश्चितपणे पक्षाची राजकीय ताकद वाढविण्यास मदत ठरेल असा विश्वास यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

तर दादांची शिव- फुले- शाहू आंबेडकरांचे सामाजिक समतेची भूमिका समाजात प्रभावीपणे राबविण्यासाठी परिषेदेवरील जागे बाबत सकारात्मक विचार केला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिष्टमंडळाला दिलाय.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे निर्मित ‘पंढरपूर वारी - इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *