राज्याच्या मुख्यमंत्री पदी जरी यावेळी मी आलो असलो तरी यापूर्वी मी आणि अजित पवार हे दोघे म्हणून औटघटकेचे सरकार स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी उपमुख्यमंत्री तर अजित पवार नंतर आमच्यासोबत आले तेही उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज मी मुख्यमंत्री झालो, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमच्यातील रोल बदललेले असले तरी आमची भूमिका एकच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजाला एकत्र घेऊन सामाजिक औद्योगिक विकासाच्या वाटेवर आता महाराष्ट्र थांबणार नाही तर विकासाच्या वाटेवर धावणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेप्रमाणे पहिल्यादांच मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाला भेट देत पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या विधानसभेत जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज कमी असेल अशी ट्रिटेमेंट आम्ही विरोधकांना देणार नाही. त्यामुळे अधिवेशन काळात विरोधकांकडून जी योग्य मुद्दे मांडल्यानंतर त्याबाबतही योग्य ती दखल राज्य सरकार घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात सुरु करण्यात आलेली लाडकी बहिण योजना आम्ही यापुढेही सुरु ठेवण्यात येणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार असल्याची ग्वाही दिली. याशिवाय लाडकी बहिण योजनेत काही त्रुटी असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने त्यात काही गोष्टीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच ज्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन लाभ घेतला आहे. त्याचा पुनर्विचार केला जाणार आहे. मात्र त्याबाबत सरसकट निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगितले.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकिय संस्कृतीचा विचार करण्याची गरज आहे. तसेच राजकिय संवाद संपलेला नाही. त्यामुळे लोकसभेत यापूर्वी विरोधी पक्षनेते पदा इतकी विरोधकांची संख्या नव्हती. परंतु विरोधी पक्षांच्या गटनेत्याला ज्या काही सोयी-सुविधा देणे आवश्यक असते त्या धर्तीवर विद्यमान विरोधी पक्षाच्या नेत्याला कायदेशीररित्या असलेल्या सुविधा देणार असल्याचेही यावेळी सांगितले.
शक्तीपीठ मार्गाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सांगलीपर्यंत शक्तीपीठाच्या कामाला मंजूरी देण्यात आली असून फक्त कोल्हापूरा भागात शक्ती पीठाच्या मार्गाला विरोध होत आहे. तसेच तेथील शेतकऱ्यांचा जमिन अधिग्रहणाला विरोध आहे. मात्र इतर ठिकाणी शेतकरी स्वतःहून शक्ती पीठ मार्गासाठी जमिन अधिग्रहण करण्यास स्वतःहून येऊन सांगत असल्याचे यावेळी सांगत सर्वांशी सर्वसमंतीने चर्चा करूनच शक्तीपीठाचा मार्ग पूर्ण करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावनार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya