Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती आहे, माहित आहे का? मग वाचा बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पीएम मोदींच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे ३.०२ कोटी रुपयांची चल संपत्ती आहे, त्यांच्याकडे ५२,९२० रुपये रोख आहेत आणि मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःची जमीन, घर किंवा कार नाही.

प्रतिज्ञापत्र पुढे दाखवते की पीएम मोदींचे करपात्र उत्पन्न २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ११ लाख रुपयांवरून २०२२-२३ मध्ये २३.५ लाख रुपये झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्या अर्जासोबत त्यांच्याकडे असलेल्या चल आणि अचल संपतीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

पीएम मोदींची स्टेट बँकेत दोन खाती आहेत. एसबीआयच्या गांधीनगर शाखेत त्यांच्याकडे ७३,३०४ रुपये जमा आहेत, तर एसबीआयच्या वाराणसी शाखेत केवळ ७,००० रुपये आहेत. तर नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदा मोदी यांची कोणती मालमत्ता आहे का या रकान्यात नरेंद्र मोदी यांनी माहिती नाही अशी माहिती दिली आहे.

पंतप्रधानांकडे एसबीआयमध्ये २,८५,६०,३३८ रुपयांची मुदत ठेव आहे.

पंतप्रधानांकडे २,६७,७५० रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.

एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून २०१४ मध्ये वाराणसीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवलेले पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा या जागेवरून निवडणूक लढवत आहेत, जिथे निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.

मंगळवारी, जेव्हा पंतप्रधान मोदी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत भाजपचे कोण आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा हे पंतप्रधानांसोबत दिसणाऱ्या नेत्यांमध्ये होते.

पंतप्रधान मोदींसोबत त्यांचे चार प्रस्तावक – पंडित गणेशवर शास्त्री, लालचंद कुशवाह, बैजनाथ पटेल आणि संजय सोनकर हे देखील होते.

मालमत्तेची माहिती असलेला कागदः-

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *