मुंबईः प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक संभाजी या दूरचित्रवाहीनी मालिकेमुळे आणि ऐतिहासिक नाटकामुळे राज्यात लोकप्रिय झालेले शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे (बदनापूर) माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. नरिमन पॉईंट येथील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बगल्यावर झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रवेश घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले. त्यांनी यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी कसे होते हे मांडले आहे. ते सुशिक्षित आहेत. त्यांचा नक्कीच निवडणुकीत फायदा होणार असल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सांगितले.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रवेशालामुळे पक्षाला फार मोठा फायदा होणार असल्याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
पक्षात नवे आहोत अशी वागणूक देणार नाही. पवार साहेबांचे मार्गदर्शन आहे. ते खंबीरपणे पाठीशी उभे आहेत असेही स्पष्ट केले.
आज विशेष आनंद की, जगाच्या पाठीवर प्रतिभावंत कलेवर प्रेम करत राजा शिवछत्रपती साकारला आणि आता राज्यातील घराघरात गाजत असलेली स्वराज्य रक्षक संभाजींचा स्वाभिमानी इतिहास उभा करणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा त्याग करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी जाहीर केले.
डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी त्यांना घड्याळ चिन्ह आणि मफलर देवून पक्षात प्रवेश दिला.
बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण यांनीही प्रवेश केला. भाजपमध्ये वाईट अनुभव घेतल्यावर ते स्वगृही परतले. तसेच नंदुरबार भाजपचे नेते यश पाटील, किशोर पाटील, भाजप डॉक्टर सेलचे हर्षल पवार यांनी प्रवेश केला. यांचे पक्षात स्वागत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील स्वागत केले.
तरुणाईला योग्य दिशेची गरज याची जाणीव फक्त शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये -डॉ. अमोल कोल्हे
अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश का करत आहे ? परंतु आज देशाच्या राजकारणात फार मोठी अस्वस्थता आहे. तरुणाईला योग्य दिशेची गरज आहे. ही जाणीव शरद पवारांसारख्या नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळे त्यांचे हात बळकट करावे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.
शिवसेनेचे सुसंस्कृत नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करायला मिळाले. आणि आता आनंद होत आहे. लहानपणी शरद पवार साहेबांची छबी बघण्यासाठी त्यांच्या गाडीमागे मी धावत होतो. परंतु आज त्यांच्याच पक्षाचे काम करायला मिळत आहे. यापुढे पक्षाचे काम अखंडपणे सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya