शिवसेना उबाठाच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून मंदिर हटविण्याचे आदेश मागे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश: दादर हनुमान मंदिर सुरक्षित

दादर पूर्व रेल्वे स्टेशन लगत साधारणतः ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वेच्या जागेवर असल्याने त्याला हटविण्याचे आदेश रेल्वे विभागाकडून जारी करण्यात आले. त्या आदेशावरून नुकतेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या मंदिर हटविण्याला विरोध दर्शवित हेच का भाजपाचं हिंदूत्व असा सवाल केला. तसेच आज या मंदिरात संध्याकाळी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार होती. तत्पूर्वीच भाजपाच्या मुंबईतील आमदार आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी धावाधाव करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मंदिर हटविण्याच्या कामाला स्थगिती आदेश मिळविला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाला हे मंदिर हटविणे चांगलेच महागात पडले असते. त्यामुळे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंदिर पाडण्याच्या कामाला स्थगिती दिली.

दादर पूर्व, मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १२ येथील स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराला आमदार मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली. या प्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषद चे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या मंदिराचे निष्कासन होणार नसून या बाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव जी यांच्याशी बोललो आहोत. या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर देखील माझ्याकडे आहे असे यावेळी सांगितले.

मंगल प्रभात लोढा यांनी आमदार आशिष शेलार यांच्या समवेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार, कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना मंगलप्रभात लोढा म्हणाले, “केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन मी देतो. या मंदिराबाबत समजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते, बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आम्ही सर्वच केंद्रीय रेल्व मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संपर्कात होतो. मंदिराचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले या पुढे सुद्धा नेहमिच करु. धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचवण्यात यशस्वी झालो.”

मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या सहायक विभागीय अभियंत्यांनी दादर येथील मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ च्या पूर्वेकडील आरपीएफ ऑफिसच्या मागे असलेल्या अनधिकृत मंदिराला ७ दिवसांची नोटीस कार्यालयीन पत्र क्रमांक

BB/W/ADEN/BY/Encroachment/notice दिनांक ०४.१२.२०२४ अन्वये दिली होती. मात्र, सदर नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील पत्रे जोडलेली आहेत.

रेल्वे प्रशासनाने जारि केलेली हीच ती ऑर्डर

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *