मुख्यमंत्री पदाचा विषय येताच अजित पवार म्हणाले, शब्दच मागे घेतो म्हणजे विषय संपला १४५ आमदाराचं पाठबळ सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे झाले उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठीचा योग काही जुळून येत नसल्याचे सांगत खंत व्यक्त केली. त्यावरून महाराष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये-नेते यांच्याकडूनही यासंदर्भात भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. इतकेच काय पक्षाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र महोत्सवातही प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.

त्यानंतर अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीच्या व्यक्तव्यावरून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही टीका केली.
मात्र आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, जर मी असे बोललो असेन तर मी माझे शब्द मागे घेतो असे सांगत या वक्तव्यावरून निर्माण होत असलेल्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांनी मलाही मुख्यमंत्री व्हायचाय पण योज जुळून येत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले की, अरे मित्रांनो ते वक्तव्य मी मिश्किलीत केले होते. तुम्ही पण काय फारच… असे सांगत पुढे अजित पवार म्हणाले की, मी जर असे बोललो असेन तर मी माझे शब्द मागे घेतो म्हणजे विषयच संपला असे सांगायला ही विसरले नाहीत.

यापूर्वीही अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत अनेकदा वक्तव्य केले. पण त्या वक्तव्याबाबत माघार कधी घेतली नव्हती. पण यावेळी वक्तव्य केल्यापासून ४८ तासातच मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरून माघार घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या १४५ आमदारांचे पाठबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यामुळे १४५ आमदारांचे पाठबळ ज्याच्या सोबत, तो मुख्यमंत्री हे साधे गणित आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मागे १४५ आमदारांचे पाठबळ होते, ते मुख्यमंत्री झाले, त्याच्याही आधी उद्धव ठाकरे साहेब यांच्यामागे १४५ आमदारांचे पाठबळ होते, म्हणून ते ही मुख्यमंत्री झाले होते असे सांगत ह्या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

कोणत्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते?

आतापर्यंत सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदी राहण्याचा मान अजित पवार यांच्या नावावर नोंदविण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या काळात आणि पुढे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदी असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान होते.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये आणि त्यानंतर आता सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.

About Editor

Check Also

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टरेट करणाऱ्यांसाठी शिष्यवृत्ती, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात अशा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *