देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर कसं वाटतंय मोकळं मोकळं… बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दही हंडी उत्सवात फडणवीसांचे भाषण

मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे दही हंडी साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा राज्यात सत्तांतर होत मुंबईसह १४ महापालिका निवडणूका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबईत भाजपा आणि शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी दहीहंडीचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले. या प्रत्येक दही हंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दही हंडी उत्सवाला भेटी दिल्या. यावेळी बंडखोर गटाचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित दही हंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करताना म्हणाले, गोविंदा आता खेळाडू आहेत. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता मोकळं-मोकळं वाटतंय, छान-छान वाटतंय, असं मिश्किल भाष्य देखील केले.

यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेते देखील उपस्थित होते.

आता आपले सरकार आहे. आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जाणार, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, की आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असेही ते म्हणाले.

तसेच आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू असेही त्यांनी सांगितले.

दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळत आहे. हिंदू सणांसोबत भाजपा आहे आणि शिवसेना या सणांना विसरली आहे, हे सर्वांना समजले आहे. वरळीच काय पूर्ण मुंबईत भाजपाचे कमळ फुलणार आहे. वरळीचा आमदार देखील भाजपाच्याच मताने निवडून आला आहे. शिवसेनेने हिंदुत्वाला कधीच सोडले असल्याची टीका आशिष शेलार म्हणाले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *