मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे वरिष्ठ नेते तथा माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावरून राजकिय पडसाद उमटले. त्यामुळे अखेर त्यांच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण झाल्याचे सांगत वक्तव्यावरून सारवासारव केली.
यावेळी पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईतील उपनगर घाटकोपर येथे काल एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्याचा गैरसमज झाला असे वाटते. हा प्रश्नच उपस्थित होत नाही की, मुंबईची भाषा मराठी आहे की नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराट्रात आहे आणि स्वाभाविकपणे मुंबईची भाषा मराठी आहे.
पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, भारतात अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, भारत यासाठी वैशिष्टेपूर्ण आहे. मुंबईत देखील अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात. त्यामुळे अपेक्षा असते की, त्यांनी देखील येथे येऊन मराठी भाषा शिकावी, समजून घ्यावी याचा आग्रह राहिलाच पाहिजे. कारण राज्याची ही वेगळी ओळख आहे. हे सह अस्तित्वाचे मोठे उदाहरण आहे. भारतात विविध भाषा बोलणारे राहुन सुद्धा एकमेकाला सहकार्य करतात. मला वाटते मुंबई देखील याचे आदर्श उदाहरण असल्याचे यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, मी स्वतः मराठी भाषिक आहे. मराठी बद्दलचा स्वाभिमान माझ्या मनात देखील आहे. पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचा सन्मानही करतो. जगात भारताने स्वतःचे एक वेगळे असे उदाहरन निर्माण केले, आपण त्याच नजरेने पहावे अशी माझी सर्वांना विनंती आहे असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya