विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रूपये वाटत असल्याचे प्रकरण बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनीच उघडकीस आणले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
त्यानंतर विनोद तावडे भाजपामधील एका बड्या नेत्याच्या संपर्कात फोनवरून संपर्कात होते. त्यावेळी आधी आक्रमक भूमिका घेणारे हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर हे नंतर मवाळ झाले. हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर हिंतेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजनही केले.
दरम्यान संबधित प्रकरणी सर्व गोष्टी ताब्यात घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा विवांता हॉटेलवर पोहोचली होती. मात्र सुरु झालेली पत्रकार परिषद बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे सुरु झालेली पत्रकार परिषद बंद करण्याची पाळी भाजपाचे विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांना भाग पडले.
मात्र हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणावर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर पोहोचले होते. तसेच पोलिसांकडून फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना हॉटेल परिसरातून निघून जाण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांची पांगापांग झाल्यानंतर भाजपाचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांना घेऊन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी त्यांच्यात गाडीत बसवून विवांता हॉटेलमधून बाहेर काढले. यावेळी गाडीच्या वाहन चालकाला क्षितीज ठाकूर यांनी बाहेर काढून त्या वाहनाचे ड्रायव्हिंग केले.
दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाच्या महायुती सरकारला आणि विधान परिषदेच्या, राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तरीही बॅगा घेऊन विनोद तावडे येत असल्याची माहिती भाजपावाल्यांनीच हितेंद्र ठाकूरांना दिली. विनोद तावडे यांच्यावर आरोप केले हितेंद्र ठाकूर यांनी तसेच तेथील तणावग्रस्त वातावरणातून बाहेर काढण्याचे कामही हितेंद्र ठाकूर यांनी केले.
त्यामुळे विनोद तावडे यांचा राजकिय काटा भाजपातील कोणत्या नेत्यांने बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून काढला अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.
Marathi e-Batmya