बारामतीतील शेवटच्या सभेत शरद पवार म्हणाले, अजित पवारला तिनदा उपमुख्यमंत्री, आता युगेंद्र युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी घेतली लेंढीवाढी पट्यात शेवटची सभा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा आज पार पडल्या. आज झालेल्या सभेमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे तमाम बारामतीवासियांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच काका-पुतण्याच्या लढाईत नातू बाजी मारणार का या विषयी उत्सुकता निर्माण झाली.

त्यातच बारामतीतील शेवटीची सभा नेहमी महत्वाची ठरते असेही बोलले जात असून शरद पवार यांच्या भाषणानंतरच बारामतीतील उमेदवाराचा जय-पराजय निश्चित होतो असे बोलले जाते. त्यानुसार अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी दिलेल्या युगेंद्र पवार यांच्यासाठी शेवटची सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंत तीन तीन वेळा अजित पवार यांना संधी देत उपमुख्यमंत्री केलं. आता पुढची पिढी ही युगेंद्र पवार यांची आहे. युगेंद्रच्या हाती सत्ता द्या असे आवाहनही यावेळी केलं.

यापुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, या आधी लोकसभेची निवडणूक पाहिली. याच जागेवर शेवटची जाहिर सभा झाली. लोकसभा निवडणूक झाली. त्या निवडणूकीच्या निकालात महाराष्ट्र काय चीज आहे हे दाखवून देणारा निकाल होता. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची इच्छा काय होती मला माहित नाही. पण या लोकसभा निवडणूकीत त्यांना ४०० जागा पाहिजे होत्या. देशाचा कारभार करायचा असेल तर ४०० खासदारांची गरज लागत नाही. जी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्यात बदल करायचा असेल तर जास्त खासदारांची गरज लागते. याचा अर्थ स्वच्छ आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलायचा प्रयत्न होता असेही यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी राज्यात लाडकी बहिण योजना आणली पण राज्यातील बहिणींच्या सुरक्षेचे काय असा सवाल करत म्हणाले की, लोकसभा निवडणूकीत ४८ पैकी ३० खासदार तुम्ही निवडून पाठवले आणि मोदींना बाजूला सारण्याचे गोग्य प्रयत्न सुरु केले. लोकसभा निवडणूकीत कमी जागा मिळाल्या म्हणून त्यांनी लाडकी बहिण योजना आणली पण दुसऱ्या बाजूला बहिणीच्या सुरक्षेचा काय असा सवाल करत ज्यांच्या हाती सरकार होते. त्यांच्या कालखंडात ६७ हजार महिलांवर अत्याचार किती झाले बघा, पोलिस स्टेशनला ज्या नोंदी झाल्या आहेत त्या ६७ हजाराहून अधिक आहेत. इतक्या बहिणींवर अत्याचार झाले. लाडकी बहिण म्हणायचं आणि दुसऱ्याबाजूला बहिणीची अवस्था काय असा सउलट सवालही यावेळी केला.

शरद पवार बोलताना शेवटी म्हणाले की, मी १९६७ ला पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यानंतर अजित पवार यांना संधी दिली. त्यांना तिनदा उपमुख्यमंत्री केलं. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. युगेंद्रच्या हाती सत्ता द्या असे आवाहन करत पुढे म्हणाले की, गेल्या काही महिन्यापासून या तालुक्यातील गावागावात फिरून त्यांनी लोकांशी संपर्क केला, जनतेशी सुसंवाद साधला. आम्ही जसं काम केलं त्यापेक्षा जास्त क्षमता युगेंद्र पवारांमध्ये असल्याचंही यावेळी आवर्जून सांगितले.

म्हारं जिकडं फिरतय तिकडं चांगभलं हुतयं फलकाने वेधलं लक्ष्य

यावेळी मेंढी पट्टा येथील सभेच्या ठिकाणी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी एक बॅनर फडकाविला. या बॅनरवर जिकडं म्हातार फिरतय तिकडं चांगभलं हुतंय असा मथळा लिहिलेला कार्यकर्त्याने लिहून आणलेला बॅनर त्यांच्या हातात घेऊन उंचावला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *