राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात वसतिगृहातील विद्यार्थ्यानाच बनविले मतदार काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून विद्यार्थी मतदारांची मतदान केंद्रावरच तपासणी

विधानसभा निवडणूकीची घोषणा जाहिर झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघात विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उमेदवारीची आणि त्यांच्या रणनीतीची चर्चा अहमदनगरसह संपूर्ण राज्यात सुरु झाली. त्यातच काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रभावती घोगरे विरूद्ध राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात सामना सुरुवातीला एककल्ली वाटत होता. मात्र आज स्थितीला पराभवाच्या छायेत असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विजयासाठी मतदारांची संख्या कमी पडू नये यासाठी चक्क नवे मतदारच निर्माण केले असल्याची धक्कादायक माहिती आज मतदानाच्या दिवशी पुढे आली.

शिर्डीत मतदानाला सकाळी ७ वाजता नियमित मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक युवक-युवती मतदानासाठी मतदान केंद्रावर येत असल्याचे दिसून येऊ लागले. तसेच अनेक युवक युवती यांना मराठी भाषाही अवगत नसल्याचे आणि त्यांना उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील वगळता कोणाचीही नावे माहित नव्हती. त्यामुळे या मतदारांची माहिती घेण्यास काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी सुरुवात केली. त्यावेळी अनेक विद्यार्थी हे शिक्षणाच्या निमित्ताने लोणी येथील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मालकीच्या एमबीबीएस आणि इंजिनियरिंग काँलेजमध्ये शिक्षणासाठी आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना घरपोच त्यांचे मतदान कार्ड बनवून त्यांच्या घरच्या पत्यावर पाठविण्यात आल्याची माहिती या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर उघडकीस आली.

याप्रकरणाची रितसर तक्रार काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनीही या विद्यार्थ्यांची चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे मतदार नोंदणीचे स्थानिक प्रमाणपत्र असल्याचे पाहून त्यांच्यावर कारवाई केली नाही. इतकेच नाही तर काही विद्यार्थ्यांशी बोलताना प्रभावती घोगरे यांनी माझ्याबद्दल माहिती आहे का असा सवालही केला. मात्र एकाही विद्यार्थ्याला त्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे असल्याची साधी माहितीही नव्हती असे दिसून आले.

दरम्यान यासंदर्भात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून यासंदर्भात आतापर्यंत कोणताच खुलासा आलेला नाही. की काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले नाही. मात्र स्वतःच्या विजयासाठी स्वतःच्याच काँलेजमधील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या विजयासाठी वापरून घेण्याचा प्रकार भाजपाचे उमेदवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नवा प्रकार केल्याचे उघडकीस आली आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *