जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, काल पंतप्रधानच बदलले आता ते माझे गटनेता पदही धोक्यात… मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते...

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे कामकाज सुरु होताच पॉईंट ऑफ प्रोसीजरनुसार सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार एकनाथ खडसे असावे यासंदर्भात पक्षाच्यावतीने सभापतींना पत्र देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र सभागृहात दाखवले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे पंतप्रधानाच बदलले आहेत. त्यामुळे माझ्याकडे असलेले पक्षाचे गटनेता पदही धोक्यात आले आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

नागालँडमध्ये रीओ हे सर्व पक्षाचा पाठिंबा घेतात, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवी पद्धत राज्यात सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते असा मिश्किल टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, वास्तविक पाहता हा विषय विधान परिषदेशी संबधित आहे. मात्र त्यात विधिमंडळाचा उल्लेख आहे. त्यामुळे तशी माहिती दिली गेली असेल. मात्र त्यातील तांत्रिक त्रुटी दूर करून चूक दुरूस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *