राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बदलापूर येथील अत्याचार प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे? राज्यातील गृह खातं मूग गिळून का गप्प बसलंय? योजना आणली, पैसे वाटले म्हणजे तुमचे बाकीचे कर्तव्य संपलं? मुख्यमंत्री राहतात त्याच जिल्ह्यात मुली सुरक्षित नसतील तर राज्यातील इतर भागात तरी कशा सुरक्षित राहतील? हा खरा प्रश्न आहे.
फक्त उद्घाटनं, सोहळे, चमकोबाजीमध्ये व्यस्त असणाऱ्या ‘इव्हेंटजीवी’ सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणीला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
आधी नवी मुंबई, आता बदलापूर !
बदलापुरात लहान मुलींवर जो प्रसंग ओढावला, तो अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
सध्या राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली नोएडा सारख्या भागांना नावे ठेवायचो आता…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 20, 2024
Marathi e-Batmya