न्या. लोया यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला आम आदमी पार्टीचा आरोप

मुंबई :प्रतिनिधी

न्यायाधीश लोया यांच्या संसयास्पद मृत्यूआधी त्यांना सोहराबुद्दीन प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना वाचविण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला.

ज्यांना ही बाब माहित होती असे एक माजी जिल्हा न्यायाधीश तसेच ज्येष्ठ वकील यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे म्हटले जाते. पण, त्यावेळी रूग्णालयातील इसीजी मशीन बेद होते आणि त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम कुटुंबियांच्या परवानगीशिवाय केले गेले. या देशात न्यायाधीशच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय, असा सवालही त्यांनी केला. लोकशाही खतऱ्यात आहे, हे सांगण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश पत्रकारांसमोर आले, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने खरेदी केलेल्या राफेल विमानाच्या सौद्याची माहिती जाहीर केलेली नाही व जाहीर करण्यास नकार दिला आहे. तेव्हाच्या युपीए सरकारने २०१२ साली याच विमानांसाठी ५०० कोटींचा सौदा केला होता. त्यावेळी ते तंत्रज्ञानही आपल्याला देणार होते. त्यामुळे पुढची निर्मिती आपल्याला करणे शक्य होते. आताच्या सरकारने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीतर्फे हा सौदा केला. ३६ जेट विमानांसाठी यावेळी ५९ हजार कोटींचा सौदा केला गेला, असा दावाही त्यांनी केला. आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष, ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रवक्त्या प्रीती मेनन यावेळी उपस्थित होत्या.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *