मराठी भाषिकांना विरोध करणारी कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला निषेध

सीमा भागातील मराठी भाषिकांना विरोध करण्याची कर्नाटक सरकारची भूमिका अन्यायकारक असल्याचे सांगत कर्नाटक सरकारचा निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य यांना अटक करण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींना स्थानबद्ध करण्यात आले. या कर्नाटक सरकारच्या कृत्याचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करीत आहे.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी देखील मराठी भाषिकांच्या लढ्यात तुरुंगवास भोगला असून याप्रश्नी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती तीच भूमिका आमच्या सरकारची आहे. सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने वकील दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देखील यापूर्वी या प्रश्नाबाबत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन देखील कर्नाटक सरकार अशी भूमिका घेत असेल तर कर्नाटक सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *