स्वर्गीय माणिकराव गावितांचे सुपुत्र भरत गावित यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिल्या शुभेच्छा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नंदूरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांनी आज प्रदेश कार्यालयात हा प्रवेश केला. त्यांचे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्षात स्वागत केले.

माणिकराव गावितांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांचाच वारसा पुढे नेत भरत गावित पक्षाच्या जनसेवेच्या कार्यात कायम तत्पर राहतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला व त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

याचवेळी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष (शिरूर लोकसभा) पदी आण्णा महाडिक आणि पुणे जिल्हाध्यक्ष (बारामती लोकसभा) पदी अमित झेंडे यांच्या उपस्थितीत नियुक्तीचा कार्यक्रम पार पडला. पक्ष बळकटीकरणात तुमचे मोठे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त करत या दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *