महाविकास आघाडीचा नारा, लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन

महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियान गँग फिरत असल्याने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

महाराष्ट्रात चड्डी बनियान गँगने हौदास घातला आहे. वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशांवर दरोडे टाकत आहे. सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होमहवन केले जात असल्याने असल्याने या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असल्याचे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

पन्नास खोके एकदम ओके..
चड्डी बनियन गँग हाय हाय..
महाराष्ट्राला लुटणाऱ्या धिक्कार असो..
दरोडेखोर चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *