Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही… नीट NEET पेपरफुटी प्रकरणी सुबोधकुमार सिंग यांच्या बदलीवरून साधला निशाणा

मागील काही दिवसापासून नीट-युजी NEET-UG आणि युजीसी-नेट UGC-NET परिक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्र सरकारडून सातत्याने घुमजाव सुरु आहे. त्यातच केंद्र सरकारने एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंग यांची संचालक पदावरून उचबांगडी केली. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, नोकरशहांची फेरबदल करणे हा भारतीय जनता पक्षाने कुजलेल्या शिक्षण व्यवस्थेतील “मुळ समस्येवर” उपाय नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या घोटाळ्यातील पैसे उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या दारात थांबतात असा गंभीर आरोपही यावेळी केला.

NEET-UG आणि UGC-NET परीक्षा पेपर लीक झाल्याबद्दल विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे प्रमुख सुबोध कुमार यांची बदली पी.के. खरोला यांनी केली आहे, जे सध्याचे अध्यक्ष आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, नीट NEET घोटाळ्यात मोदी सरकारच्या उच्चपदस्थांच्या दारात पैसा थांबला आहे. भाजपाने कुजवलेल्या शिक्षण व्यवस्थेतील स्थानिक समस्येवर नोकरशहांची फेरबदल करणे हा उपाय नाही. एनटीए ही स्वायत्त संस्था असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात ती भाजपा/आरएसएसच्या विकृत हितासाठी बनवण्यात आली होती, असा आरोपही X वरील पोस्ट मध्ये केला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले, पेपर लीक, भ्रष्टाचार, अनियमितता आणि शिक्षण माफियांनी आमच्या शिक्षण व्यवस्थेत घुसखोरी केली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, मोदी सरकारला जबाबदार धरले पाहिजे. आता, NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गेल्या १० दिवसांत ४ परीक्षा एकतर रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या उशीराने सुचलेल्या सरकारला सुचलेल्या शहाणपणामुळे असंख्य तरुण विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाचा परिणाम मात्र केंद्र सरकारवर पडतच नाही. केवळ सरकार विद्यार्थ्यांना फक्त त्रासच देत राहणार असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २२ जून रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा पदव्युत्तर (NEET PG) परीक्षा पुढे ढकलली, जी २३ जून रोजी होणार होती आणि लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे सांगितले.

NEET-PG परीक्षा २३ जून रोजी होणार होती, विशिष्ट स्पर्धा परीक्षांच्या अखंडतेबाबत अलीकडील आरोपांच्या घटना विचारात घेऊन, आरोग्य मंत्रालयाने प्रक्रियेच्या मजबूततेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे आयोजित नीट-पीजी NEET-PG प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने आपली भूमिका निवेदनाच्या माध्यमातून जाहिर केली.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकातून जाहिर केले की, खबरदारीचा उपाय म्हणून, २३ जून २०२४ रोजी होणारी नीट-पीजी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरात लवकर अधिसूचित केली जाईल,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

तसेच विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय मनापासून दिलगीर आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी घेण्यात आला असल्याचे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

नीट-युजी NEET-UG परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (NTA) परीक्षेतील कथित अनियमिततेबद्दल टीकेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे देशभरात अनेक निदर्शने झाली, निदर्शक आणि राजकीय पक्षांनी NTA बरखास्त करण्याची मागणी केली.

या परिक्षेतील ६७ उमेदवारांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवले, ज्यामुळे परिक्षेच्या संदर्भात संशय झाला. यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी परीक्षा प्रक्रियेच्या यंत्रणेतील सुधारणा, डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये सुधारणा आणि NTA च्या कार्यपद्धतीवर शिफारशी करण्यासाठी तज्ञांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय समिती पुढील दोन महिन्यांत आपला अहवाल मंत्रालयाला सादर करणार आहे.

 

Check Also

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *