Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा

केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने त्यांच्या सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश दिला आहे आणि त्यांच्या धोरणांवर आणि हेतूंवर मंजुरीची मोहर उमटवली आहे.

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले की, भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे आणि लोकांना नारे नव्हे तर पदार्थ हवे आहेत. मात्र त्यांना वादविवाद हवा आहे, संसदेत गडबड नको,’ अशी टीका इंडिया आघाडीवर करत ५० वर्षापूर्वी याच दिवशी देशात राज्यघटना निलंबित करण्यात आली. तोच आजचा दिवस आहे. परंतु ६० वर्षानंतर सलग तिसऱ्यांदा सत्तास्थानी विराजमान झालेले सरकार राज्यघटनेचे संरक्षण करणारे सरकार असल्याचे सांगितले.
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर्तृहरी महताब यांना राष्ट्रपती भवनात लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ दिली.

लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी हे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणारे पहिले होते. त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम शपथ घेतली.
संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांना ऑफर करण्यासारखे काही नवीन नाही आणि नेहमीप्रमाणेच “मुद्यांना बगल” देण्याच्या प्रयत्नाचा अवलंब केला. पंतप्रधानांना जनतेच्या निकालाचा खरा अर्थ समजल्याचा कोणताही कृती दाखवली नाही असा पलटवारही यावेळी केला.

तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या वतीने संसदेच्या आवारात राज्यघटनेची प्रत हाती घेत निदर्शन मोर्चा काढला. त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे १८ व्या लोकसभेच्या प्रारंभापूर्वीच्या त्यांच्या वक्तव्यात काहीही नवीन नव्हते आणि “नेहमीप्रमाणेच मुख्य मुद्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला.” आणि गेल्या १० वर्षांची “अघोषित आणीबाणी” होती हे ते विसरले आहेत अशी खोचक टीकाही यावेळी केला.

पुढे बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी नेहमीच्या प्रथेपेक्षा लांबलचक भाषण केले, परंतु स्पष्टपणे, नैतिक आणि राजकीय पराभवानंतरही त्यांच्यातील अहंकार कायम आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोदी काहीतरी बोलतील अशी देशवासीयांना आशा होती, अशी टीकाही यावेळी केली.

मल्लिकार्जून खर्गे पुढे बोलताना म्हणाले की, नरेंद्र मोदीजी, तुम्ही विरोधकांना सल्ला देत आहात. तुम्ही आम्हाला ५० वर्ष जुन्या आणीबाणीची आठवण करून देत आहात, परंतु गेल्या १० वर्षांच्या अघोषित आणीबाणीचा विसर पडला आहे, जी लोकांनी संपवली,” असे खर्गे यांनी आपल्या ‘X’ वरील पोस्टमध्ये म्हटले.

Check Also

अंबादास दानवे म्हणाले, सभापतींचा निर्णय एकांगी, अन्यायकारक निलंबनाची कारवाई नीलम गोऱ्हे यांनी जाहिर केल्यानंतर व्यक्त केली खंत

सोमवारी विधान परिषद सभागृहात शाब्दिक चकमकीनंतर सभापती यांनी आज केलेल्या निलंबनाच्या कारवाईचा निर्णय हा एकांगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *