विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार देत निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही केली होती. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतील विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित जुळवित कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार कोणत्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार याबाबतचे मतदारसंघ जाहिर कऱणार असल्याचे जाहिर केले होते. तसेच यासाठी आज सकाळपासून सर्व उमेदवारांची बैठक आज अंतरावली सराटीत बोलावली होती. ती बैठक सकाळपासून सुरु झाली. त्या बैठक आणखी काही काळ चालणार आहे. त्यानंतर मतदारसंघ आणि उमेदवार जाहिर करणार असल्याची घोषणा केली.
यासंदर्भात मनोज जरांगे यांनी आयोजित केलेल्या छोटेखानी पत्रकार परिषदेत सांगितले की, बीडे, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या जागांवर जिंकू शकतो त्याच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण राजकारणासाठी समाजाचा पराभव होवू देणं आम्हाला परवडणार नाही. शेवटी समाज महत्वाचा असून समाजाला दुखवायचं नसल्याचेही यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ज्यांनी आम्हाला त्रास दिला, त्यांचा पराभव आम्ही करू असे सांगत अद्याप आणखी काही जागांसंदर्भात निर्णय घेणार असून त्याबाबतची घोषणा सहकाऱ्यांशी करून घेऊ आणि त्यानंतर निर्णय जाहिर करणार असल्याचेही यावेळी सांगितले.
या मतदारसंघात उमेदवार देणारः
१) केज (राखीव) बीड
२)परतूर (जालना जिल्हा)
३)फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)
४) बीड (बीड जिल्हा)
५) हिंगोली
६) पाथरी (परभण जिल्हा)
७) हदगांव (नांदेड जिल्हा)
तर उमेदवार पाडणार असलेले जिल्हेः
१) भोकरदन (जालना जिल्हा)
२) गंगापूर (छत्रपती संभाजी नगर)
३) कळमनुरी (हिंगोली जिल्हा)
४) गंगाखेड, (परभणी जिल्हा)
५) जिंतूर (परभणी जिल्हा)
६) औसा (लातूर जिल्हा)
कोणत्या जिल्ह्यात पाठिंबा देणारः
बदनापूर राखीव- जालना जिल्हा
पश्चिम विधानसभा- छत्रपती संभाजीनगर जिल्हा
दरम्यानस कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर, भोकरदन हे मतदारसंघ शिंदे शिवसेना-भाजपाकडे आहेत. तर बीड जिल्ह्यात शरद पवार यांच्या संदीप क्षिरसागर आहेत. त्यामुळे या सहाही मतदारसंघात उमेदवार पाडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तर केज, बीड, परतूर, फुंलब्री, हिंगोली, पाथरी आणि हदगांव हे मतदारसंघही शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपाकडे आहेत. तर या मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार देण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे सध्याच्या पहिल्या मतदारसंघाच्या यादीची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यापैकी संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघात उमेदवार देणार असून बदनापूरात राखीव मतदारसंघात पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
Marathi e-Batmya