विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै पासून नागपूरला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून तीन महिन्यानंतर आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात  विधान भवन, नागपूर  येथे ही बैठक बोलविली आहे.  विधान सभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहे. तर, विधान परिषदेचे कामकाज हे दुपारी १२.०० वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश काल दि. ३१ मे २०१८ रोजी राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आले आहेत.

वास्तविक पाहता सुरु असलेल्या अधिवेशनातच पुढील अधिवेशनाची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फक्त अधिवेशनाची तारीख विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ४ जुलै ही तारीख जाहीर केली होती. मात्र त्यानंतर नागपूर येथील व्यवस्थेवरून राज्य सरकारसमोर मोठ्या प्रमाणावर समस्यांचा डोंगर निर्माण झाला होता.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *