मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परभणीत राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या दिवसाचे औचित्य साधत शिवसेनाओएफसीचे आमदार तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली घेऊन राज्य सरकारकडून घेण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
यावेळी बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी देशमुख कुटंबियांची भेट घेतल्यानंतर म्हणाले की, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबियातील व्यक्ती ज्याला स्वतःचे घर नाही असा व्यक्ती या गावातील निवडणूकीत निवडूण येवून सलग १५ वर्षे सरपंच पदावर राहतो ही साधी गोष्ट नाही. तसेच अशा व्यक्तीची हत्या करण्यात ही घटना अतिशय वाईट असून या प्रकरणातील आरोपीना पकडण्यासाठी पोलिस यंत्रणा शोध घेत असल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणातील फरार आरोपींना अटक केल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. मात्र ती अधिकृत नाही. त्यामुळे मी या विषयावर अधिक बोलणार नाही. मात्र हि माहिती खरी असेल तर राज्य सरकारने कडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला यश येत असल्याचे म्हणावे लागेल. आरोपींना अटक करून त्यांना कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीवेळी संतोष देशमुख यांचे लहान बंधू हे ही यावेळी उपस्थित होते. त्यावेळी संतोष देशमुख यांचे लहान भाऊ म्हणाले की, या प्रकरणात माझेही नाव कारण नसताना घेतले जात आहे. मात्र मी माझ्या आईची आणि मृत पावलेल्या भावाची शपथ घेऊन सांगतो की जर माझा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले तर मी माघार घेईन असेही यावेळी सांगितले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी याकरिता शिवसेना शिंदे यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मागणी करणार आहोत. तसेच या गुन्हेगाराशी कोणात्या राजकिय पक्षाच्या नेत्याचा संबध असेल तर त्या नेत्याची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya