संदीप देशपांडेसह १२ मनसैनिकांना १८ पर्यंत न्यायालयीने कोठडी

मुंबईः प्रतिनिधी
मुंबईतील आझाद मैदानालगत असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी  मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यासह १२ मनसैनिकांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसैनिकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करून किल्ला कोर्टात आज सोमवारी हजर करण्यात आले. त्यावेळी किल्ला कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना १८ डिसेंबर अखेर पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
एल्फीस्टन येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होवून निष्पाप मुंबईतील २७ चाकरमान्यांचा बळी गेला. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मोर्चा काढून त्यांना हटविण्याची मोहिम हाती घेतली होती. काही दिवसांपूर्वी मालाड, दादर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या. मात्र त्याविरोधात मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका घेत मनसेच्या आंदोलनाला विरोध केला.  त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. याप्रकरणी  अखेर पोलिसांनी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यासह १२ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करत अटक केली. तसेच त्यांना किल्ला कोर्टात सोमवारी हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना १८ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

 

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *