नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी
परतीच्या पावसाने राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान केले असून सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अहमदनगरच्या शेतकर्‍याने सोयाबीनचे उभं पीक पेटवून दिले. याचा अर्थ सरकारला शेतकर्‍यांच्या अडचणी कळत नसल्यानेच शेतकरी इतक्या टोकाची भूमिका घेत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे आमचे नेते शरद पवार शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकर्‍यांची आस्थेने चौकशी करत आहेत. त्यामुळे त्यावर कोणती उपाययोजना करायची यावर पक्षाच्यावतीने निश्चित विचार केला जाणार आहेच. शिवाय याप्रकरणी राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीआयडी प्रकरणी जलद कारवाईसाठी कायद्यात बदल करणार आर्थिक फसवणूक प्रकरणांमधील आरोपीवर कडक कारवाई

आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *