लालू प्रसाद यादव यांच्या आरोपाला नरेंद्र मोदींचे तेलंगणात उत्तर

देशातील लोकसभा निवडणूकींता कालावधी जवळ येत चालला आहे तसतसे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडून ठिकठिकाणी जाहिर सभा सत्ता परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याच्या हालचाली राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यातच काल बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने आयोजित जाहिर सभेला मोठ्या प्रमाणावर तेजस्वी यादव यांच्या समर्थकांनी गर्दी केली. या सभेत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना नरेंद्र मोदी हे हिंदू नाहीत असा खळबळजनक गौप्यस्फोट करत त्यांची आईचे निधन झाल्यानंतर दाढी आणि डोक्यावरचे केस काढले नाहीत. तसेच मोदींना मुल-बाळं नसल्याने परिवारही नसल्याचा खोचक टोला लगावला.

 

लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या टीकेमुळे भाजपाच्या नेत्यांना आणि दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांना काय उत्तर द्यावे या संभ्रमात आणून सोडले. मात्र विरोधकांना उत्तर देणार नाहीत ते मोदी कसले. तेलंगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कामांचे उद्घाटन करताना झालेल्या जाहिर सभेत बोलताना देशातील १४० कोटी जनतेच्या स्वप्नांना साकारण्यासाठी मी घर सोडले. या देशातील जनताच माझी परिवार असल्याचे मी मानतो असे जाहिर केले. मोदींच्या या भाषणानंतर भाजपाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच मोदी का परिवार असल्याचा नारा देण्यास सुरुवात केली. त्या बरोबर देशातील भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याबरोबरच देशातील भाजपाच्या प्रदेश आणि बुथ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी स्वतःच्या नावापुढे मोदी का परिवार असे लिहीत मोदींचा परिवाराबद्दल लालू प्रसाद यादव यांनी उपस्थित केलेल्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आमदार, खासदारांनीही आपल्या नावाच्या पुढे मोदी का परिवार असे लिहित देशात नरेंद्र मोदी हे एकटेच नसल्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी केल्याचे दिसून येत आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *