राष्ट्रवादीचा पलटवार, बावनकुळे यांनी मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा आणि नंतर बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जादूटोणा केल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला.

जादूटोणा,भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा असा इशाराही त्यांनी यावेळी बावनकुळे यांना दिला. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा असा टोला लगावतानाच शरद पवार यांची पकड महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया पवार साहेबांची आहे.

त्यामुळे २९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असा खोचक टोलाही त्यांनी  बावनकुळे यांना लगावला.

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *