सुप्रिया सुळे म्हणाल्या, जागतिक पातळीवर तेलाचे दर कमी पण त्याचा लाभ… आगामी काळात देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येते

आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना येत असून यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आवश्यक ती पावले उचलून नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

देशातील पेट्रोल, दूध, डाळी व इतर धान्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या सहा महिन्यांमध्ये दूधाच्या दरात तब्बल १२ रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी गाठली असून जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. परंतु तरीदेखील त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना अद्याप मिळालेला नाही. देशातील आयात-निर्यातीचे गुणोत्तर पुर्णतः कोसळले आहे. देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या उत्पादनांमध्ये घट झाली आहे. याखेरीज चलनवाढीचा दर साडेसहापेक्षा जास्त (६.५२) इतका झाला आहे याकडेही खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले.

या अतिशय गंभीर बाबी असून आगामी काळातील देशातील महागाईचे चित्र काय असेल याची कल्पना यावरुन येऊ शकते असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *