‘पहचान कौन’ प्रश्न विचारत ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असे सांगत नवाब मलिकांचा गौप्यस्फोट समीर वानखेडेंच्या पहिल्या निकाहाचे आणि जन्म दाखला जाहिर

मुंबईः प्रतिनिधी
आर्यन खान ड्रग्जप्रकरणातील एक पंच असलेल्या प्रभाकर सैल याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्यपध्दतीबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाहरूख खान याच्याकडे २५ कोटींची खंडणी मागितल्याचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि त्यांच्या पहिल्या लग्नाचे अर्थात निकाहचे फोटो ट्विटरवर शेअर करत एक खळबळ उडवून दिली.
‘पहचान कौन’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन आणखी खळबळ उडवून दिली.
तर ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचा जन्म दाखला शेअर करुन फर्जीवाडयाची पोलखोल केली.

एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.
आज ट्वीटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जन्म प्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
समीर वानखेडे यांच्याबाबत आज नव्याने कागदपत्रे आणि फोटोस् नवाब मलिक यांनी प्रसिध्द करत राज्याबरोबरच देशात एकच खळबळ उडवून दिली असून त्यांनी जाहिर केलेल्या फोटो आणि जन्म दाखल्यावरून वानखेडे यांच्या नोकरी मिळविण्याच्या हेतू बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *