जयंत पाटील स्टाईलने पदाधिकाऱ्यांचेच केले क्रॉस व्हेरिफिकेशन युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मार्गदर्शक

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काम करण्याची स्टाईल कशी हटके आहे हे जगजाहीर आहे. मात्र नवीन प्रदेशाध्यक्षांच्या काम करण्याच्या निराळ्या पद्धतीचे दर्शन आज पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनाही घडले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळ्यापासून अत्यंत धडाडीने आपल्या कामाची सुरुवात केली आहे. आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जयंत पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची आढावा बैठक बोलावली होती. दरम्यान आपल्या कामाची माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी यादी उपस्थितांसमोर मांडली. जयंत पाटील यांनी थोडीही वेळ न घालवता पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या कार्यकर्त्यांना थेट फोन लावला आणि क्रोस व्हेरिफिकेशन केले.

दरम्यान दहाऐवजी तीन पदाधिकारी तरी असले तर हरकत नाही पण आपण स्वतःची फसवणूक करायला नको असे उद्गार त्यांनी काढले. 

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नवे प्राधिकरण स्थापन करणार विधानसभेत सांस्कृतिक कार्य विभागाच्या चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी व्यापक पावले उचलली जात असून युनेस्को मानांकन मिळालेल्या गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच असंरक्षित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *