राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ९ उमेदवारांची तिसरी यादी मोहोळमधून रमेश कदम यांच्या पत्नीला तिकिट

विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता दोन दिवस शिल्लक आहेत. त्यातच अनेक जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीला उमेदवार मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे जो उमेदवारी निवडूण येऊ शकतो त्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची तयारी जवळपास राज्यातील सर्वच प्रमुख राजकिय पक्षांनी घेतली आहे. त्या आधारे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली.

या तिसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने कारंजा-ज्ञायिक पटणी यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तर हिंगणाघाट येथून अतुल वांदिले यांना, हिंगणातून रमेश बंग यांना, तर अनुशक्तीनगर मधून अभिनेत्री स्वरा भास्करा यांचे पती फहाद अहमत यांना उमेदवारी दिली आहे. अनुशक्तीनगर मतदारसंघात सना मलिक-शेख यांच्या विरोधात ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

चिंचवडमधून राहुल कलाटे यांना भोसरीतून अजित गव्हाणे यांना, माजलगांव मधून मोहन बाजीरावर जगताप यांना, परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी शरदचंद्र पवार पक्षाने दिली आहे. तर मोहोळमधून वादग्रस्त आमदार रमेश कदम यांना यावेळी उमेदवारी न देता रमेश कदम यांची मुलगी सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ११ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिसऱ्या यादीत या ९ जणांना उमेदवारी

१. कारंजा – ज्ञायिक पटणी

२. हिंगणघाट – अतुल वांदिले

३. हिंगणा – रमेश बंग

४. अणुशक्तीनगर – फहाद अहमद

५. चिंचवड – राहुल कलाटे

६. भोसरी – अजित गव्हाणे

७. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप

८. परळी – राजेसाहेब देशमुख

९. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

About Editor

Check Also

दुबईत अडकलेल्यांना मराठी जनांना विशेष विमानाने मुंबईत परत आणणार दुबईत अडकलेल्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील १६४ पर्यटक आणि नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी तातडीने दोन विशेष विमाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *