राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना सरसकट आर्थिक मदत करा

संपूर्ण महाराष्ट्र ओला आणि कोरड्या दुष्काळाचा सामना एकाचवेळी करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ पंचनामे करुन नागरिकांना व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. यावर सविस्तर माहिती देताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, राज्यात जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पूरपरिस्थितीमुळे ९४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून ३ हजारांहून अधिक पशुधनही दगावले आहेत. घरात पाणी शिरल्याने हजारो घरांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडलेला नाही त्यामुळे तिथे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे असे म्हटले.

About Editor

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *