राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण – सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते
राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, महायुतीतील जागा वाटपानुसार राज्याच्या विधानसभा निवडणूकीसाठी ५५ जागा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र तर शिवसेना शिंदे पक्षाला ८० जागा आणि भाजपा १५५ जागी निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र महायुतीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप अधिकृतरित्या जाहिर केला गेला नाही.
परंतु शिवसेना शिंदे पक्षाच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी यादीवर भाजपाचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे पक्षाने त्यांच्या पक्षातील उमेदवारांबाबतही लोकसभा निवडणूकीप्रमाणे भाजपाचा सल्ला शिरोधार्ह मानले आहे. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून भाजपाच्या चार ते पाच जणांना उमेदवारी जाहिर केली. तर नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असतानाही भाजपाने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध कायम ठेवला आहे. त्याबाबत भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने विरोध असतानाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपाच्या महायुतीत असून सुद्धा भाजपाकडे नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला नाही.
याशिवाय तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहिर झाल्यानंतर दुसरी यादी अद्याप जाहिर करण्यात आली नाही. तसेच भाजपाचे असलेले नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनाही कोकणातून उमेदवारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या
नेतृत्वात आज महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
सर्व उमेदवारांना मनःपूर्वक विजयी शुभेच्छा!!… pic.twitter.com/QVBYAJPOL3— Sunil Tatkare (@SunilTatkare) October 27, 2024
Marathi e-Batmya