शिंदे गटाच्या रविंद्र वायकर यांनी दाखल केला उबाठा गटाच्या आमदाराविरोधात गुन्हा मतमोजणी केंद्रात शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ४ जून, २०२४ रोजी उबाठा गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रविंद्र वायकर यांनी निवडणूक लढवली होती. ४ जून रोजी नेस्को सेंटर येथे मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या दिवशी ज्यांना ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी ४.०० ते ८.०० या दरम्यान प्रवेश केला. त्यांच्यासोबत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता. याबाबत रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना अमोल कीतर्किर आणि विलास पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करत मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांनी केली. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वनराई पोलीसांनी विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईकचे आदेश, अवैध प्रवासी वाहतूक रोखा.. १ मार्च पासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवणार..

राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *