राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीचे राजकारण वाढल्याचा आरोप मागील अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका जाहिर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी जातीयवादाचे एक तरी पुरावा द्यावा अशी मागणी केली. त्यावर एका दूचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी छगन भुजबळ य़ांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रसंगाचा दाखला देत कदाचित शरद पवार हे विसरले असतील तर त्यांना त्यावेळचे पुस्तकही पाठवून देतो असा खोचक टोला लगावला. त्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत ती तर दोन विचारधारांमधील फरक होता असे सांगायला असे सांगत शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करताना म्हणाले की, शरद पवार हे जातीयवाद करतात त्यांच एक उदाहरण देतो, त्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांकडेही आहे. पुण्याच्या एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टीळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. ती काढून त्यांनी ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरं तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पण यापुढे पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा असं म्हणण याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे. ते एक उदाहरण दाखवा म्हणाले हेच ते उदाहरण असा खुलासाही यावेळी केला.
दरम्यान, शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर बोलताना आयुष्यात काहीही केलं नाही अशी टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर देताना म्हणाले की, शरद पवार यांना वयोमानानुसार काही गोष्टी आठवत नसतील पण मी अनेक ज्यागोष्टी केल्या त्याचं पुस्तक त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना समजेल की, ते कोणत्या गोष्टी विसरले आहे. पण मी हे मान्य करतो की, मला एक गोष्ट जमली नाही. ती म्हणजे की मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. मागच्या बाजूनं पिल्लं कशी सोडायची आणि कसं राजकारण उभं करायचं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. छोट्या संघटना स्थापन करून त्यांना आर्थिक पाठबळ द्यायचं आणि त्यातून राजकारण करायचं हे राज्यातील जनतेनं बघितलं त्यामुळे त्यांचं राजकारण काय आहे त्यांना माहिती आहे. ते जातीय वाद करतात अशी अनेक उदाहरण देता येतील अशी टीकाही यावेळी केली.
शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनीही उडी घेतली होती. यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, पुणेरी पगडी आणि फुले पगडी ही प्रतिकं असून ती दोन विचारधारांमधील लढाई आहे. त्याला जातीय वाद म्हणणं सर्वथा चुकीचे असल्याचही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya