Breaking News

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब

विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत सुरळीत पार पडल्यानंतर काल रात्री राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या निर्माण झालेल्या राजकिय तिढा सोडविण्यासाठी सर्वपक्षिय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र त्या बैठकीकडे विरोधकांकडून पाठ दाखविण्यात आली. त्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर प्रत्यारोप करत सभागृत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यास विरोधकांकडूनही प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरु झाल्याने अखेर विधानसभाध्यक्षांनी दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करत नंतर दिवसभरासाठी स्थगित केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा विदर्भात आज सकाळी बसलेल्या भूकंपाच्या मुद्यावरून निवेदन केल्यानंतर भाजपाचे आमदार अमित साटम यांनी राज्य सरकारच्या सर्वपक्षिय बैठकीकडे विरोधी पक्षांनी पाठ फिरविल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे विरोधकांच्या भूमिकेचा पर्दाफाश झाल्याचा आरोप करत यांना राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे यांना या दोन्ही समाजातील तेढ कायम ठेवायची असल्याचे धोरण दिसते असा आरोप केला.

त्यावर विधानसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्येच भाजपाचे आशिष शेलार यांनी विजय वडेट्टीवार यांना थांबवित बैठकीला येतो म्हणून निरोप देणारे आणि आता येतो मग येतो म्हणणारे विरोधक चर्चेच्या वेळी का आले नाहीत असा सवाल केला. कोणाचा फोन विरोधकांना आला होता म्हणून विरोधकांनी चर्चेकडे पाठ फिरवली असा सवाल यावेळी विरोधकांना केला. तसेच तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. मग विरोधकांनी चर्चेच्या बैठकीकडे पाठ का फिरवली असा सवालही यावेळी उपस्थित केला.

दरम्यान सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधकांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत गदारोळ करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांची भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणा बाबतचा वाद हा राज्य सरकारनेच निर्माण केलेला आहे. जनतेला अंधारात ठेवण्याचे काम महायुती सरकारने केले असल्याचे सांगत असताना सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ वाढण्यास सुरुवात केली. या गोंधळातच सभागृहाचे कामकाज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५ मिनिटासाठी तहकूब केले.

त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले असता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर राज्य सरकारने बोलविलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुन्हा एकदा विरोधकांवर शरसंधान साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांवर सत्ताधाऱ्यांकडून आरोपाच्या फैरीही झाडण्यात येत होत्या.

यावेळी पुन्हा एकदा भाजपाचे आशिष शेलार यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत कोणाचा फोन आला, कोणाचा मेसेज आला म्हणून विरोधक बैठकीला आले नाहीत असा सवाल केला. जेव्हा दोन्ही बाजूचा समाज त्यांच्यातील आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारला विनंती करतो आणि त्यावर मार्ग काढा म्हणतो त्यावेळी विरोधक पळ काढतात असा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकाबाजूला एका समाजाशी चर्चा करतात, तर एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समाजाची चर्चा करतो. या सरकारला असे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही तर तेढ निर्माण करायचे असल्याचा आरोप केला. दरम्यान सभागहात सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा गदारोळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज परत एकदा काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा भाजपाचे सदस्य नीतेश राणे यांनी विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला असा आरोप केला. सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात विरोधकांना त्यांची बाजूच मांडू न देण्याचा चंग बांधला.

दरम्यान, विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरं तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार या गोंधळातच म्हणाले की, सरकारने आंदोलकांना काय आश्वासन दिले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांच्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महायुतीचे पितळ उघडे पडेल या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत २०० च्यावर आमदार आहेत. तरी देखील आरक्षाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोपही केला.
त्यामुळे साधारणत दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारात विधानसभेचे कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब केले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *