Breaking News

NEET UG प्रश्नी संसदेत विरोधकांचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार प्रस्ताव मांडला. एनईईटीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात गोंधळ घातला. जनता दल JD(S) खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी NEET मुद्द्यावर सरकारचे समर्थन केले, तर अध्यक्ष जगदीप धनकड यांनी खासदार सागरिका घोष, डेरेक ओब्रायन आणि साकेत गोखले यांना सभागृहातील गोंधळाबद्दल जबाबदार धरले.

दरम्यान काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सकाळीच काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आज आम्ही NEET परिक्षेशी संबधित महत्वाच्या प्रश्नावर चर्चेची मागणी स्थगन प्रस्तावा द्वारे करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आम्ही चर्चेत सहभागी होण्याचे निमंत्रण देत आहोत असे सांगितले.

काँग्रेस खासदार फुलो देवी नेताम सभागृहाच्या वेलमध्ये विरोध करत असताना बेशुद्ध पडल्याने विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला. विरोधी पक्षाचे खासदार सभागृह तहकूब करण्याची मागणी करत होते, त्याला अध्यक्षांनी नकार दिला.

तर लोकसभेतही विरोधकांकडून नीट NEET परिक्षा प्रश्नी स्थगन प्रस्ताव सादर करत चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज १ जुलै पर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या सदस्यांनी सर्व कामकाज स्थगित करून NEET परिक्षेशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी करत होते. गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्या दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सभागृह चर्चा करणार असल्याने ते त्यास परवानगी देऊ शकत नाहीत, असे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या उत्तराने विरोधक शांत न झाल्याने गदारोळ सुरूच राहिला आणि त्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.

गुरुवारी आपल्या भाषणात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी हे राज्यघटनेवर थेट हल्ला करण्याचा “सर्वात मोठा आणि काळा अध्याय” म्हणून वर्णन केले आणि असंवैधानिक शक्तींवर देशाचा विजय झाला. नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि दोषींना शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, असल्याची ग्वाहीही दिली होती.

Check Also

नाना पटोले यांची टीका, …बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय काँग्रेसच्या न्यायपत्राची नक्कल, पण नक्कल करतानाही ७००० रुपयांची कमीशनखोरी

राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यात अजून पाऊस पडलेला नाही, शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *