अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग केवळ हा चहापानाचा फार्स कशासाठी असा सवाल विरोधकांच्यावतीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला नऊपानी पत्रातून केला आहे. तसेच चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहिर केले.
अंबादास दानवे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि विरोधक यांच्यात विसंवाद असल्याचे एकाबाजूला मान्य केले. परंतु हा संवाद पुन्हा सुरु करण्यासाठी संवादच साधायचा नाही असा सवाल उपस्थित करत पुढे अंबादास दानवे आपल्या पत्रात म्हणाले की, प्रत्येक वेळी विरोध पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या सूचनाचा आपणाकडून कोणताही आदर होत नाही. विरोधी लोकसप्रतिनिधीनी तनहितार्थ केलेल्या सूचनां आणि विकास कामे करताना विचार करावा. पण चहापानाच्या व्यतीरिक्त सरकार म्हणून विरोधकांशी संवाद साधण्याचे औदार्य दाखविले जात नाही म्हणून विरोधी पक्षांकडून सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात येत असल्याचे जाहिर केले.
विरोधकांच्या पत्रात अंबादास दानवे पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी काम करत असल्याचा आभास सरकार निर्माण करत आहे. पण राज्यातील कृषी विभागातील घोटाळा, मंत्र्यांवर होत असलेले आरोप, मंत्र्यांना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा, मंत्र्यांनी फक्त भाजपा कार्यकर्त्यांनाच निधी देणार असल्याची जाहिर सभेत घोषणा करणे यावरून आम्हाला राज्यात लोकशाही की हुकुमशाही असा सवाल निर्माण होत आहे. भ्रष्टाचार, अनियमितता आणि जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून स्वतःचा फायदा कसा होईल यावर भर दिला जात आहे. शासनाने पारदर्शकतेची ग्वाही दिलेली असली तरी प्रत्यक्षात काय घडत आहे असा सवालही यावेळी केला.
अंबादास दानवे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे माजी आमदार सुनिल केदार यांच्याबाबत न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर त्यांची आमदार की तातडीने रद्द करण्यात आली. तोच न्याय विद्यमान कृषी मंत्र्यांना का लावला जात नाही. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला वेगळा न्याय कसा असा सवालही यावेळी उपस्थित करत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले. मात्र या प्रकरणातील आरोपी संतोष आंधळे यास अद्याप अटक झाली नाही की तो अद्याप सापडला नाही. मध्यंतरी एसटी महामंडळामध्येही मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाला, त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या निविदाहीयाच सरकारने मंजूर केली होती. मग आता ती रद्द करण्याची वेळ का आली असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
शेवटी आपल्या पत्रात अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी १५०० रूपये योजना सुरु केली. मात्र आज या योजनेतील जवळपास ५० लाख बहिणीची पात्रता रद्द कऱण्यात येत आहे. यासह अनेक मुद्यावर विरोधकांनी आक्षेप घेत सरकारी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहिर केले.
विरोधकांनी राज्य सरकारला पाठविलेले हेच ते ९ पानी पत्रः

Marathi e-Batmya