राजकारण

हर्षवर्धन सपकाळ यांचे गणरायाला साकडे, शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री व सरकारला दे.. राहुल गांधींना स्टँडअप कॉमेडियन म्हणणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले, गेट वेल सून देवेंद्रजी

राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. शेतातील पिके जळून गेली आहेत, जी पिकं शिल्लक आहेत ती पूर्णपणे वाया गेली आहेत म्हणून शेतकरी त्यावर नांगर फिरवत आहे. सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असून सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात चिंतेचे वातावरण आहे पण सरकार मदतीबाबत काहीही कारवाई करत नाही. …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुण्याची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित झाली आहे. पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव ‘पुणे महोत्सव’ म्हणून राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त शनिवारवाड्याच्या …

Read More »

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल पदवी हातात, नोकरी कुठे? रिक्त सरकारी पदांची भरती कधी?: झीनत शबरीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत असताना, मुंबई युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मेरी डिग्री का क्या?’ या अभियानाची सुरुवात केली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी गांधी भवन पत्रकार परिषद घेऊन या अभियानाची माहिती दिली. देशातील लाखो तरुण उच्च शिक्षण घेऊन पदव्या मिळवत आहेत; मात्र …

Read More »

शरद पवार यांची मागणी, राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचे पत्र

राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला असून त्यांच्या  शेतातील उभी पिके पावसाअभावी करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. पत्रात पुढे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा आरोप, शेतकरी पंचाग बघुन आत्महत्या करत नाही संभाजीनगरच्या सभेत शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आणि शिंदे यांच्या शिवसेनेसह राज्य सरकारवर टीका करत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकरी पंचांग पाहुन नव्हे तर दुःख भोगून आत्महत्या करतोय खड्यात घाला तुमचे मुहूर्त अशा शब्दात 5 ऑक्टोंबरपासून पंचनामे सुरु करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दुष्काळ सुरु करून …

Read More »

सुप्रिया सुळे याची मागणी, लाडक्या बहिणीच्या पाच हजार कोटींच्या वितरणाची चौकशी करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पैशांची उधळपट्टी

राज्य सरकारने  ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत कोणतीही लपवाछपवी न करता खरी आणि निर्दोष आकडेवारी जारी  करावी. या योजनेबाबतची श्वेतपत्रिका तातडीने प्रसिद्ध करावी आणि ५ हजार  कोटींच्या अपात्र वितरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एक्स या …

Read More »

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करा

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील …

Read More »

बीड-पुणे रेल्वेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न रेल संख्या “झिरो वन फोर झिरो वन” प्रस्थान के लिए तयार है हा आवाज परिसरात घुमला

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक व आनंददायी ठरला आहे. अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या ‘बीड-पुणे’ थेट रेल्वेसेवेचा आज राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शानदार शुभारंभ करण्यात आला. याच भरगच्च कार्यक्रमात बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला मोठी चालना देणाऱ्या यशवंतराव …

Read More »

एनसीएमसी NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM Appद्वारे सहज करता येणार Top-up QR कोड स्कॅन करून काही क्षणांत कार्ड रिचार्ज; ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सुविधा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी NCMC कार्डधारकांना आता भीम अॅप BHIM Appच्या माध्यमातून आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा …

Read More »