राजकारण

अतुल लोंढे यांचा सवाल, ७/१२ कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांनाच सांगावे १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर काँग्रेस सरकारने ‘मनरेगा’ आणली; फलोद्यान योजना आणली, फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी क्रांती घडवली, तुम्ही काय केले?

राज्यात कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर दुष्काळ असल्याचे चित्र आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, तो सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे, पण भाजपाचे फडणवीस सरकार अजून अभ्यास करण्यातच मग्न आहे. शेतकऱ्यांचा संताप लक्षात आल्याने शेवटी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत पण त्याचा उपयोग काय? …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, निवडणूक मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मनमानी आज शिक्कामोर्तब झाली ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकण्याची केली मागणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशातील  जवळपास २१ हून अधिक राज्यात एसआयआर अभियान राबविले. मात्र या अभियाना दरम्यान, मतदार यादीतील मतदारांची नावे कमी करणे, मतदारांना अपात्र ठरविणे आदी गोष्टी केल्या. त्यामुळे देशातील अनेक जवळपास कोट्यावधी मतदारांना निवडणूकीच्या काळात मतदानापासून रहावे लागले. त्यातच इंग्रजी वर्तमान पत्र इंडियन एक्सप्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, • गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना तातडीने उपचार, • रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि एकात्मिक रुग्णवाहिका यंत्रणेवर भर

राज्यातील रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य तसेच संबंधित यंत्रणांनी अधिक समन्वयाने काम करावे. अपघात नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण आणि अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवरमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे चार निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतले निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो कारशेडसाठी जमीन दिलेल्या मोघरपाड्याच्या १९८ शेतकऱ्यांना विकसित भूखंडांचे वाटप, मुंबईतील खार (प) येथील रामकृष्णनगर मधील म्हाडाच्या इमारतींचा समूह पुनर्विकास, धुळे शहर विकास योजनेतील भूखंडावरील आरक्षणात बदल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंच्या समावेशाबाबत उपसमिती गठीत करा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) बैठकीत दिले निर्देश

राज्यातील उच्च शिक्षणाच्या सुविधा समन्यायी पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात आणि नवीन महाविद्यालये सुरू करता यावीत, यासाठी विद्यापीठांच्या पंचवार्षिक आराखड्याबाहेरील स्थळबिंदूंचा समावेश करण्यासाठी उपसमिती गठीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोग (माहेड) यांची बैठक मंत्रालयात झाली.या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत आहे. देशभरात सुरु असलेले हे षडयंत्र महाराष्ट्रातही आले असून एसआयआरच्या नावाखाली राज्यातील ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली आहेत, हा सर्व प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून निवडणूक आयोग वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करत …

Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर, पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, अमरावती विभाग शिक्षक आणि पुणे विभाग शिक्षक या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर …

Read More »

कर्नाटक पॅटर्नच्या धर्तीवर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थापन केली दुष्काळी मंत्रिमंडळ समिती शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मान्सून पाऊसाचा कालवधी संपण्याचा कालावधी अधिकृतरित्या ५ ऑक्टोंबर रोजी संपणार आहे. मात्र तत्पूर्वीच मान्सूनच्या पावसाने राज्यातील अनेक भागात उघडीप दिली. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हातची पिके जाण्याची शक्यता निर्माण झाली. तर काही ठिकाणी पिके हातची गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. कर्नाटकातही अशीच परिस्थिती …

Read More »

पंकजा मुंडे यांचे आदेश, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;

जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा. तसेच महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरणातंर्गत परदेशातील रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री …

Read More »