Breaking News

काय चाललंय या सरकारचं पालघर,भंडारा-गोंदीया निवडणूकीतील मतदान प्रक्रियेप्रकरणी प्रवक्ते मलिक यांचा संतप्त सवाल

मुंबई: प्रतिनिधी

पालघर,भंडारा-गोंदियामध्ये मशीनचा गैरवापर करत सरकार निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकसभा निवडणूकीमध्ये याप्रकारच्या तक्रारी येत आहेत त्यावेळी उत्तरप्रदेशच्या गैरानामध्येसुध्दा ३०० मतदान केंद्रावर मतदान होवू शकले नाही. २५ टक्के भंडाराच्या मतदान केंद्रावर मतदान करता आले नाही. पालघरमध्येसुध्दा तीच परिस्थिती आहे. काय चाललंय या सरकारचं…असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, साम दाम दंड भेद वापरुन ईव्हीएम मशीनच्या सहकार्याने निवडणूक जिंकू… त्याप्रमाणे मशीन सुरतहून आणण्यात आल्या आहेत. ज्यावेळी आम्ही यावर प्रश्न उपस्थित केला की, डिसप्लेच्यावेळी मशीनवर मतदान करताना ते मत भाजपला जात होते. यावेळी सांगण्यात आले की तांत्रिक बिघाड आहे. दुरुस्ती केली जाईल. काही मतदान केंद्राबाहेर मतदार मतदान करण्यासाठी ताटकळत होते. काही ठिकाणी दोन-दोन तास मशीन सुरु होत नसल्याचे चित्र होते.

जिथे भाजपला मतदान मिळत नाहीय तिथे पाच-पाच तास मतदान प्रक्रिया थांबवली जात आहे. मतदानापासून वंचित ठेवले जात आहे. भाजप नियोजनबध्द पध्दतीने मशीनचा वापर करत निवडणूक आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी मतदान करण्यास अडथळा आला आहे त्याठिकाणी किमान बॅलेट पेपरने मतदान करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

देशात ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. लोकशाहीमध्ये मतदार याबाबत शंका घेत असेल तर निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *