अनेक महिलांचे लैगिंक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करत असल्याच्या आरोपावरून जर्मनीत पळून गेलेला जनता दल सेक्युलरचा खासदार प्रज्वल रेवण्णा आज पहाटेच्यावेळी केंम्पेगौडा विमानतळावर उतरला. केम्पेगौडा विमानतळावर प्रज्वल रेवण्णा हा उतरताच त्यास कर्नाटक पोलिसांच्या एसआयटी पथकाने अटक केली. अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून बेंगळुरू न्यायालयात शुक्रवारी बलात्काराच्या आरोपाखाली हजर करण्यात आले. न्यायालयानेही प्रज्वल रेवण्णा यास ६ जूनपर्यंत विशेष तपास पथक (एसआयटी) कोठडी सुनावली.
प्रज्वल रेवण्णाला केम्पेगौडा विमानतळावरून पाच सदस्यीय महिला पोलिसांच्या पथकाने आदल्या दिवशीच उतरताच ताब्यात घेतले.
त्याच्या अटकेनंतर, हसन खासदार प्रज्वल रेवण्णा यास वैद्यकीय तपासणीसाठी शहरातील रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्याला रिमांड सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची सेक्स टेप व्हायरल होताच प्रज्वल रेवण्णा हा जर्मनीला पळून गेला होता.
कर्नाटक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला पकडले आणि चौकशीसाठी सीआयडी कार्यालयात नेण्यात आले.
दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, पोलिस तपासाचा एक भाग म्हणून प्रज्वल रेवन्ना यांच्यावर क्षमता पोटेनन्सी चाचणी करण्याचा विचार करत आहेत.
शिवाय, हसन खासदार प्रज्वल रेवण्णा असलेल्या सेक्स टेप फॉरेन्सिक्स सायन्स लॅबोरेटरी डिव्हिजनला पाठवण्यात आल्या आहेत. अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरण्यात येणारे प्राथमिक उपकरण ओळखण्यासाठीही टीम काम करत आहे. व्हिडीओ शूट करण्यासाठी कोणता मोबाईल वापरला गेला हे त्यांना ठरवायचे आहे आणि त्याबद्दल प्रज्वल रेवण्णा याची चौकशी करतील.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक उपकरण नष्ट करण्यात आले आहे. जर तपासकर्ते ते शोधू शकले नाहीत, तर प्रज्वल रेवण्णावर “साक्षी पुरावे छेडछाड” चा अतिरिक्त आरोप लावला जाणार आहे.
महिलांना लैंगिक कृत्ये करण्यास भाग पाडल्याच्या अनेक व्हिडिओंपैकी एक व्हिडिओ लीक झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर टीका सुरु झाली, त्यानंतर प्रज्वल रेवण्णा जर्मनीला पळून गेला. भारत सोडण्यासाठी त्यांनी राजनैतिक पासपोर्टचा वापर केला.
३१ मे रोजी चौकशी पथकासमोर हजर राहून चौकशीला सहकार्य करतील असा एक व्हिडिओ संदेश प्रज्वल रेवण्णा याने काही दिवसांपूर्वी जारी केला होता. त्यानंतर एका आठवड्यानंतर प्रज्वल रेवण्णा देशात परतला. आपल्यावरील खटले खोटे असल्याचा दावाही प्रज्वलने त्या व्हिडिओच्या माध्यमातून केला होता.
Marathi e-Batmya