प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जावीपूर्वक हल्ला महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट नागपूरातील हिंसाचाराच्या घटनेवर व्यक्त केली प्रतिक्रिया

नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत या मागे राज्य सरकारमधील एक विषारी मंत्री उघडपणे द्वेष पसरवित असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे असा आरोप केला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा असे आवाहनही यावेळी केले.

प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज अधोरेखित करत सध्या नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याने समाजात शांतता आणि संयम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

About Editor

Check Also

राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *