प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन, परभणी प्रकरणी…जरा या अहवालाकडेही लक्ष द्या मुख्यमंत्र्यांनी महिला आयोग, SC- ST आयोग, मानवी हक्क आयोगाच्या रिपोर्टकडे बघावे

महिला आयोग, एससी, एसटी आयोग, मानव अधिकार आयोग यांचा जो अहवाल येईल, त्याच्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि त्यानंतर आय. जी आणि एस.पी यांनी त्यांना खरी माहिती दिली का ? याचा त्यांनी तपास करावा आणि योग्य कारवाई करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे वक्तव्य केले आहे. त्यामध्ये तथ्य आहे. ते माझ्या संपर्कात होते. त्यांना विनंती केली की, १४-१५ वर्षांच्या मुली पकडण्यात आल्या त्यांना सोडण्यात यावं, पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार तत्काळ थांबवावा आणि कोंबिंग ऑपरेशन ताबडतोब थांबवावं. देवेंद्र फडणवीस आणि आय.जी यांच्याशी माझा कॉन्फरन्स कॉल झाला. आय.जी ने यामध्ये लक्ष घालतो असे म्हटले. आज जे देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले की, आय.जी आणि एस.पी यांनी सांगितले की, कॉम्बिंग ऑपरेशन झाले नाही. कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये काही जणांची घरे तोडण्यात आली आहेत, घरात घुसून मारण्यात आले आहे. एका सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला सुद्धा मारण्यात आलेले आहे. अशा सर्व घटनांनची चौकशी ही आय. जी आणि एस.पी नाही, तर इतर कमिटी मार्फत करावी आणि पीडितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *